इराक-इराणचा प्रवास टाळण्याची भारतीयांना सूचना

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 9 जानेवारी 2020

इराण आणि अमेरिकेची संघर्ष भूमी बनलेल्या इराकमध्ये वातावरण तापले असल्याने भारतीयांनी या देशातला प्रवास टाळण्याची सूचना परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. सोबतच इराकमधील भारतीयांना दूतावासामार्फत मदतीची तयारीही भारत सरकारने केली आहे. अन्य आखाती देशांमधील भारतीयांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी मदतीची तयारी सरकारने केली आहे.

नवी दिल्ली - इराण आणि अमेरिकेची संघर्ष भूमी बनलेल्या इराकमध्ये वातावरण तापले असल्याने भारतीयांनी या देशातला प्रवास टाळण्याची सूचना परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. सोबतच इराकमधील भारतीयांना दूतावासामार्फत मदतीची तयारीही भारत सरकारने केली आहे. अन्य आखाती देशांमधील भारतीयांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी मदतीची तयारी सरकारने केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमेरिकेने इराकमध्ये ड्रोनद्वारे हल्ला करून इराणचे सर्वोच्च लष्करी अधिकारी कासीम सुलेमानी यांना ठार केल्यानंतर इराणनेही अमेरिकेच्या लष्करी तळावर दहाहून अधिक क्षेपणास्त्रे डागून प्रत्युत्तर दिले. यात अमेरिकेचे ८० हून अधिक सैनिक ठार झाल्याचा दावा इराणी सैन्यातर्फे करण्यात आला आहे. या हल्ला-प्रतिहल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली असून इराण, इराकसोबतच आखातातील सौदी अरब, संयुक्त अरब अमिराती, कतार, कुवैत यांसारख्या देशांवरही या संघर्षाचा परिणाम होणार असल्याने या देशांमध्ये नोकरीसाठी गेलेल्या भारतीयांची परिणामी केंद्र सरकारचीही चिंता वाढली आहे.

आयात कांदा खपवायचा कसा?

भारताने अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांना शांततेचे आवाहन केले आहे. मात्र, इराणच्या क्षेपणास्त्रहल्ल्यानंतर संघर्ष चिघळण्याची शक्‍यता पाहता इराकमधील भारतीयांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी इराकमधील भारतीयांना मार्गदर्शक सूचना देताना त्यांच्या मदतीसाठी बगदादमधील दूतावास आणि आणि एर्बिलमधील वाणिज्य दूतावासाचे कामकाज नियमितपणे सुरू राहणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

इराकमधील नागरिकांना प्रवासाबाबतच्या मार्गदर्शक सूचना करताना परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे, की इराकमधील तणावाची परिस्थिती पाहता भारतीय नागरिकांनी अनावश्‍यक प्रवास टाळावा. तसेच, तेथील अनिवासी भारतीयांनीही सजग राहूनच प्रवास करावा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indians advised to avoid Iraq-Iran travel