
नवी दिल्ली : जातिनिहाय जनगणनेच्या प्रक्रियेला उद्यापासून (ता. १६) सुरुवात होणार आहे. उद्या जनगणनेची अधिसूचना प्रसिद्ध होईल. गृहमंत्री अमित शहा यांनी आज दिल्लीत गृहसचिव, नोंदणी महासंचालक आणि जनगणना आयुक्त यांच्यासह गृह खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जनगणना प्रक्रियेच्या तयारीचा आढावा घेतला.