ai technology
sakal
‘एआय’मुळे सर्व क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल होणार असून, त्या बदलांमध्ये अनेक संधी आणि धोकेही आहेत. या सर्वांचा एकत्रित विचार करून सर्वंकष ‘एआय’ धोरणाची गरज आहे. माहितीचे सार्वभौमत्व, राष्ट्रीय सुरक्षा यांसारख्या गोष्टींचा यावर या धोरणात विचार करायला हवा.
नवी दिल्ली - भारताच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरणावर आधारित एक महत्त्वाचा अहवाल आज (ता. १५ जानेवारी) ‘एआय गॅम्बिट’ या परिषदेमध्ये प्रसिद्ध केला जाणार आहे. स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुपने तयार केलेला हा अहवाल देशाच्या AI धोरणाला केवळ सामाजिक-आर्थिक उपयोगांपुरते मर्यादित न ठेवता वैज्ञानिक शोध, राष्ट्रीय सुरक्षा आणि भविष्यातील जागतिक सत्ता-समीकरणांशीही जोडण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.