
जेरुसलेम : ‘‘मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाइंडपैकी एक असलेल्या तहव्वूर राणाला ज्या प्रमाणे अमेरिकेने भारताच्या हवाली केले, त्याचप्रमाणे पाकिस्तानने हाफिज सईद, साजिद मीर आणि झकीउर रहमान लखवी या प्रमुख दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात द्यावे,’’ अशी मागणी भारताचे ईस्त्राइलमधील राजदूत जे. पी. सिंह यांनी केली आहे.