
पोर्ट ऑफ स्पेन : भारत लवकरच पहिल्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक असेल. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर आणि क्वांटम संगणक यांविषयीचे भारताचे प्रयत्न विकासाचे नवे इंजिन ठरत आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या दौऱ्यामध्ये काढले. तसेच, नव्या भारतासाठी आकाशही ठेंगणे असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.