भारताचा सर्वात मोठा पप्पू, अमित शहा; तृणमूल काँग्रेसची भाजपविरुद्ध मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amit Shah and Rahul Gnadhi

भारताचा सर्वात मोठा पप्पू, अमित शहा; तृणमूल काँग्रेसची भाजपविरुद्ध मोहीम

कोलकाता : तृणमूल काँग्रेसने आपल्या कार्यकर्त्यांना दुर्गापूजेदरम्यान भारतीय जनता पक्षाचे नेते (भाजप) अमित शहा यांना लक्ष्य करणाऱ्या खास 'टी-शर्ट'ची अधिकाधिक प्रसिद्धी करण्यास सांगितले आहे. या 'टी-शर्ट'वर भाजप नेते शहा यांचा फोटो वापरून त्यावर 'भारताचा सर्वात मोठा पप्पू' असे लिहिले आहे. (Amit Shah news in Marathi)

हेही वाचा: Queen Elizabeth II Passes Away : राणी एलिझाबेथ यांचं निधन; ९६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हा 'टी-शर्ट' पांढरा, काळा, पिवळा अशा अनेक रंगात उपलब्ध आहे. भाजप अनेकदा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांना 'पप्पू' म्हणून संबोधते, ज्याद्वारे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पक्ष आता शहा यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे.

दुर्गापूजेच्या वेळी या मोहिमेला मोठ रूप देण्याचा पक्षाचं नियोजन आहे. कारण त्या या वेळी पश्चिम बंगालच्या अनेक भागांमध्ये दुर्गापुजेसाठी मोठ्या प्रमाणात लोक जमतात.

तृणमूलचे नेते आणि राज्यसभा सदस्य डेरेक ओब्रायन म्हणाले, 'आपला मुद्दा मांडण्यासाठी हास्यास्पदपणा हा सर्वात शक्तिशाली मार्ग आहे. हे आमचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या सूचनेनंतर सुरू झाले आणि सोशल मीडियावर सर्वत्र पसरले.

2 सप्टेंबर रोजी, कोळसा चोरी प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सात तासांहून अधिक काळ चौकशी केल्यानंतर, 2 सप्टेंबर रोजी पत्रकारांशी संवाद साधताना अभिषेक बॅनर्जी यांनी शाह यांचे "भारतातील सर्वात मोठे पप्पू" असे वर्णन केले होते.

दुसऱ्याच दिवशी बॅनर्जी यांचे नातेवाईक आकाश बॅनर्जी आणि अदिती ग्याने यांनी भारतातील सर्वात मोठं पप्पू अमित शहा असे स्लोगन असलेले 'टी-शर्ट'वर घातलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तृणमूलशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, अभिषेक बॅनर्जी यांनी पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांना टीशर्टचे नवीन 'डिझाइन' तयार करून सुमारे 300 रुपयांना टी-शर्ट विकण्यास सांगितले आहे.

Web Title: Indias Biggest Pappu Tmc Designed T Shirt To Attack Amit Shah With Cartoon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..