India Census 2026 : जातीनिहाय जनगणनेला अखेर २०२६ चा मुहूर्त; दोन टप्प्यांमध्ये प्रक्रिया पार पडणार
Caste Based Census : राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या जातीनिहाय जनगणनेला २०२६ मध्ये प्रारंभ होणार आहे. याअंतर्गत जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि लडाखमधून ही जनगणना सुरू होईल.
नवी दिल्ली : राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनलेल्या जातीनिहाय जनगणनेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. ही प्रक्रिया दोन टप्प्यांत राबविली जाणार असून एक ऑक्टोबर २०२६ पासून तिला प्रारंभ होईल.