Air Pollution : देशातील शहरांचा श्वास गुदमरतोय! सर्वाधिक प्रदूषित २० शहरांच्या यादीत भारतातील १३ शहरांचा समावेश
IQ Air Report : IQAir 2024 च्या अहवालानुसार जगातील २० सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारतातील १३ शहरे आहेत. बर्निहाट हे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले, तर दिल्ली सर्वाधिक प्रदूषित राजधानी आहे.
नवी दिल्ली : देशातील प्रदूषणाची पातळी सातत्याने वाढत असून जगातील सर्वाधिक प्रदूषित २० शहरांच्या यादीमध्ये भारतातील १३ शहरे आहेत. मेघालयातील बर्निहाट हे शहर या यादीत पहिला क्रमांक मिळवीत ते जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले.