भारतात कोरोनाचा उद्रेक वाढतोय; गेल्या 24 तासांत...

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 जुलै 2020

देशात एकूण रुग्णसंख्या 12,38,635 वर

नवी दिल्ली : भारतासह जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. देशात एकूण रुग्णसंख्या 12,38,635 वर पोहोचली. 4,26,167 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आत्तापर्यंत 7,82,606 रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पण देशात आत्तापर्यंत 29,861 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशात एकूण रुग्णसंख्या 12,38,635 वर पोहोचली आहे. तर गेल्या 24 तासांत 45,720 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. हा आकडा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. याशिवाय तब्बल 1129 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. 

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी यातील बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही मोठे आहे. 

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण 

देशातील विविध राज्यांत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. सध्या महाराष्ट्रात 3,37,607 लाख नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. हा आकडा इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहे. याशिवाय महाराष्ट्रात सध्या 1,37,282 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आत्तापर्यंत 1,87,769 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, महाराष्ट्रात आत्तापर्यंत 12,556 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

तमिळनाडूतही वाढताहेत रुग्ण

महाराष्ट्रानंतर तमिळनाडू राज्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. सध्या तमिळनाडू राज्यात 1,86,492 यापैकी 1,31,583 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर 51,765 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 3,144 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

कोरोना संबंधातील 10 महत्त्वाच्या ...

दिल्लीत रुग्णसंख्या सव्वालाखांवर...

राजधानी दिल्लीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या तिथे 1,26,323 रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिल्लीत सध्या 14,954 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. पण 1,07,650 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indias COVID19 case tally crosses 12 lakhs