भारतात कोरोनाबाधितांची संख्या 8 लाख पार; पण गेल्या 24 तासांत...

वृत्तसंस्था
शनिवार, 11 जुलै 2020

- भारतात सध्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

- भारत जगात तिसऱ्या स्थानावर

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना व्हायरस अमेरिका, ब्राझील, भारत आणि रशियासह आता जगभरात थैमान घालत आहे. भारतातही याचे प्रमाण वाढत आहे. सध्या भारतातील रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भारतात आत्तापर्यंत 8,20,916 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांची यापूर्वी इतर देशांच्या तुलनेने कमी होती. मात्र, आता त्यामध्ये वाढ झाली आहे. तसेच यातील मृतांची संख्याही वाढत आहे. देशभरात सध्या 8,20,916 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 22,123 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत 5,15,386 कोरोनाग्रस्त रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाबाधित रुग्णांचा राष्ट्रीय मृत्यूदर 2.72 टक्क्यांपर्यंत खाली आहे. तर या सरासरीपेक्षा 30 राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांचा मृत्यूदर यापेक्षा कमी आहे. त्याचबरोबर कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे देशाचे एकूण प्रमाण आता 62.42 टक्के इतके झाले आहे.

भारत जगात तिसऱ्या स्थानावर

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या भारतात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे यापूर्वी भारताची जागतिक क्रमवारीत खालच्या स्थानावर होता. मात्र, आता यामध्ये वाढ झाल्याने आता भारत तिसऱ्या स्थानावर गेला आहे. तर अमेरिकेमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्याने अमेरिकेचे रुग्णसंख्येबाबतीत स्थान कायम आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 8 लाख पार...

भारतात सध्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आत्तापर्यंत 8,20,916 नागरिकांना कोरोनाची लागण झाली. तर यामध्ये 22,123 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. तर सध्या 5,15,386 कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करुन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. याशिवाय यातील महत्त्वाची बाब म्हणजे देशात सध्या 2,83,407 ऍक्टिव्ह केसेस आहेत. 

पुणे : पूर्व हवेलीत कोरोनाचे थैमान ...

गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ

गेल्या 24 तासांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या 24 तासांत 27,114 नवी प्रकरण समोर आली आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indias COVID19 case tally crosses 8 lakh