नवी दिल्ली : भगवद्गीता (Bhagavad Gita) आणि भरतमुनींच्या ‘नाट्यशास्त्र’ या ऐतिहासिक ग्रंथांच्या हस्तलिखितांना ‘युनेस्कोच्या (UNESCO) मेमरी ऑफ दि वर्ल्ड रजिस्टर’मध्ये (Memory of the World Register) स्थान मिळाले आहे. यंदा या रजिस्टरमध्ये एकूण ७४ ऐतिहासिक दस्तावेजांचा समावेश करण्यात आला असून त्यात गीता आणि नाट्यशास्त्र या महाग्रंथांचाही समावेश आहे.