esakal | एप्रिल मध्यावधीमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर; SBIच्या तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता
sakal

बोलून बातमी शोधा

corona

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने देशातील अनेक भागांमध्ये हातपाय पसरायला सुरवात केली आहे.

एप्रिल मध्यावधीमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर; SBIच्या तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने देशातील अनेक भागांमध्ये हातपाय पसरायला सुरवात केली आहे. या दरम्यानच आता तज्ज्ञांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवरुन लोकांना सावध केलं आहे.  स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संशोधकांच्या टीमने अशी भीती व्यक्त केली आहे की, एप्रिलच्या मध्यावधीमध्ये दुसरी लाट टोकाला जाऊ शकते. इतकंच नव्हे तर जवळपास 25 लाख लोकांना या लाटेचा तडाखा बसू शकतो. तज्ज्ञांच्या मतानुसार, ही लाट कमीतकमी 100 दिवसांची असू शकते. याचा अर्थ याची सुरवात जर फेब्रुवारीपासून झालीय असं गृहीत धरलं तर या लाटेचा परिणाम मे-जूनपर्यंत पहायला मिळू शकतो. 

हेही वाचा - आठवड्याला 50 लाख भाडं; कोरोना लस बनवणाऱ्या पूनावालांनी लंडनमध्ये घेतलं महागडं घर
लसीकरणामुळे आशा
तज्ज्ञांनी म्हटलंय की, आतापर्यंत या लाटेच्या प्रभावाला कमी करण्यासाठी लॉकडाऊन आणि इतर प्रतिबंधात्मक उपाय लागू केले आहेत त्याचा काही विशेष फायदा दिसून आलेला नाहीये. अशा परिस्थितीत लसीकरणाकडूनच आशा आहे. लसीकरणाची मोहिम आणखी गतीने करुन जास्तीतजास्त लोकांना सुरक्षित करण्याचा हाच एक उपाय असल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. दररोज 34 लाखापेक्षा जास्त 40 ते 45 लाख लोकांना लस दिली जाणे अत्यावश्यक आहे. 
पुन्हा रुग्णवाढ
देशात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आतापर्यंत एक कोटी 17 लाख लोक संक्रमित झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या अहवालानुसार, 22 ऑक्टोबरनंतर देशात पहिल्यांदाच एका दिवशी 53 हजारहून अधिक केसेसची नोंद झाली आहे. गुरुवारी 53,476 नवे रुग्ण आढळले आहेत. याआधी 22 ऑक्टोबर 2020 रोजी हा आकडा 54,366 होता. गेल्या 24 तासांत 251 लोकांचा मृत्यू झाला आहे. 

loading image