
मुंबई : जागतिक दर्जाचे भौतिकशास्त्रज्ञ आणि पोखरण अणु चाचण्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे भारताच्या अणु कार्यक्रमाचे शिल्पकार ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. राजगोपाल चिदंबरम (वय ८८) यांचे शनिवारी (ता. ४) पहाटे ३.२० सुमारास निधन झाले. जसलोक रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी चेल्ला आणि मुली निर्मला आणि नित्या असा परिवार आहे.