खूशखबर ! संपूर्ण भारतीय बनावटीची कोरोनावरील पहिली लस तयार

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 जून 2020

भारत बायोटेकनं करोनावरील लस 'कोव्हॅक्सिन' तयार केल्याची घोषणा केली आहे. आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी (एनआयव्ही) यांच्यासोबत मिळून त्यांनी यशस्वीरित्या भारतातील पहिली करोना लस तयार केली आहे.

हैद्राबाद : भारत बायोटेकनं करोनावरील लस 'कोव्हॅक्सिन' तयार केल्याची घोषणा केली आहे. आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी (एनआयव्ही) यांच्यासोबत मिळून त्यांनी यशस्वीरित्या भारतातील पहिली करोना लस तयार केली आहे. या लसीला भारत सरकारने मानवी चाचणीसाठी परवानगी दिली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI)ने परवानगी दिल्यानंतर आता जुलै महिन्यापासून या लसीवर ह्युमन क्लिनिकल ट्रायल होणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

एसएआरएस-सीओव्ही -२ स्ट्रेनला पुण्यातील एनआयव्हीमध्ये वेगळो करण्यात आले आणि नंतर भारत बायोटेककडे वर्ग करण्यात आले. हैदराबादच्या जिनोम व्हॅलीमध्ये असलेल्या भारत बायोटेकच्या बीएसएल -3 (बायो-सेफ्टी लेव्हल 3) हाय कन्टेंनमेंट फॅसिलिटीमध्येही लस विकसित करण्यात आली, असं भारत बायोटेककडून सांगण्याते आले आहे. या अगोदर कंपनीने प्रीक्लिनिकल अभ्यासामधून मिळविलेले निकाल सादर केले होते. मानवी वैद्यकीय चाचण्या पुढील महिन्यात देशभरात सुरू होणार आहेत.

भारत बायोटेकविषयी
भारत बायोटेक ही हैदराबादमधील फार्मा कंपनी आहे. भारत बायोटेक कंपनीचा लस बनवण्याचा दीर्घ अनुभव आहे. पोलिओ, रेबीज, रोटाव्हायरस, जपानी इनसेफ्लाइटिस, चिकनगुनिया आणि जिका व्हायरसवर आतापर्यंत कंपनीने लस बनवल्या आहेत. त्यानंतर आता या कंपनीने कोरोनावर लस बनविली असल्याचा दावा केला आहे.

आम्हाला अभिमान असल्याचे कंपनीच्या संचलकांचे मत
कोविड -१९ वरील देशात विकसित केलेली ही देशातील पहिली लस असून आम्हाला त्याचा अभिमान आहे. या लसीच्या विकासात आयसीएमआर आणि एनआयव्हीचा सहभाग हा महत्त्वपूर्ण होता. सीडीएससीओच्या सक्रिय सहकार्याने आणि मार्गदर्शनाने याला मंजुरी देण्यात आली. आमच्या संशोधन टीमनं आणि उत्पादन टीमने आमच्या स्वतःच्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने यासाठी अथक परिश्रम घेतले असल्याचे मत भारत बायोटेकचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा एला यांनी व्यक्त केलं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indias first COVID-19 vaccine candidate COVAXIN gets DCGI approval human trials to begin in July