आनंदाची बातमी; भारताच्या कोरोना लसीचा पहिला टप्पा यशस्वी; कोणतेही दुष्परिणाम नाहीत

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 14 August 2020

आईसीएमआरकडून बनवली जाणारी कोविड-19 लस (Coronavirus vaccine) पहिल्या मानवी चाचणीच्या टप्प्यात यशस्वी ठरली आहे.

नवी दिल्ली- आईसीएमआरकडून बनवली जाणारी कोविड-19 लस (Coronavirus vaccine) पहिल्या मानवी चाचणीच्या टप्प्यात यशस्वी ठरली आहे. चाचणीनंतर चांगले परिणाम दिसून आले आहेत. त्यामुळे लस सुरक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे. भारत बायोटेक आणि जायडस कैडिलाच्या कोरोनावरील लसीवर बारा शहरांमध्ये मानवी चाचणी सुरु आहे.  भारतातील 12 शहरांमधील 375 स्वयंसेवकांना कोरोनावरील लस देण्यात आली आहे. त्यांच्यावर या लसीचा काय परिणाम पडतोय हे पाहिलं जात आहे. 

मोठी बातमी : भारतीयांचा यूके, अमेरिका, कॅनडा आणि युएईला प्रवास शक्य

कोणतेही साईड इफेक्ट दिसले नाहीत

पीजीईआई रोहतक (PGI Rohtak)  येथे सुरु असणाऱ्या मानवी चाचणीच्या प्रमुख सविता वर्मा यांनी याबाबत माहिती दिली आहे. लस सुरक्षित आहे. आम्ही जितक्या स्वयंसेवकांना लस दिली, त्यांच्यामध्ये कोणतेही दुष्परिणाम दिसून आले नाहीत. त्यामुळे स्वयंसेवकांना आता लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. याआधी स्वयंसेवकांची रक्त तपासणी केली जात आहे. याद्वारे स्वयंसेवकांमध्ये योग्य प्रमाणात प्रतिकारशक्ती तयार होत आहे का, हे पाहिलं जाईल, असं त्या म्हणाल्या आहेत.  

लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचं आपल्याला समजलं आहे. त्यामुळे आता दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीची तयारी सुरु करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात लस किती प्रभावी आहे, हे कळून येईल. याआधी स्वयंसेवकांचे रक्त तपासणीसाठी घेतले जात आहे, असं वर्मा यांनी सांगितलं. ही लस सुरक्षित आहे.  एम्समध्ये (AIIMS) भारत बायोटेक लसीच्या परिक्षणसाठी 16 स्वयंसेवक भरती करण्यात आले आहेत, अशी माहिती अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे मुख्य अन्वेषक संजय राय यांनी दिली

इस्त्रायल-युएई मैत्रीमुळे भारताशी पंगा घेणाऱ्या राष्ट्राला दणका बसणार

आईसीएमआरच्या मदतीने बनत आहे लस 

कोरोनावरील प्रभावी लस तयार करण्यासाठी जगभरातील देश प्रयत्न करत आहेत. यात भारताचाही समावेश आहे. सरकार देशातील कोविड-19 लसीवर लक्ष ठेवून आहे. कोवॅक्सिन भारताची पहिली कोरोना लस आहे. भारत बायोटेक भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) सहयोगाने ही लस विकसित करत आहे.  सर्व 12 ठिकाणी लसीच्या सुरक्षेबाबत खात्री झाल्यानंतर कंपनी दुसऱ्या टप्प्यासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाला संपर्क करेल. सर्व काही सुरळित झालं तर पुढील वर्षाच्या जून महिन्यापर्यंत लस उपलब्ध होऊ शकते, असं तज्त्रांचं मत आहे.

(edited by-kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India's first human test of corona vaccine successful