Gaming Industry in India : गेमिंग म्हणजे टाईमपास नव्हे; २०२३ मध्ये एक लाख रोजगाराच्या संधी निर्माण करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pimpri
Gaming Industry in India : गेमिंग म्हणजे टाईमपास नव्हे; २०२३ मध्ये एक लाख रोजगाराच्या संधी निर्माण करणार

Gaming Industry in India : गेमिंग म्हणजे टाईमपास नव्हे; २०२३ मध्ये एक लाख रोजगाराच्या संधी निर्माण करणार

भारतातल्या गेमिंग क्षेत्रामध्ये २०२३ या आर्थिक वर्षात २० ते ३० टक्क्यांची वाढ होणार असून त्यामुळे एक लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नेक्स सनराईज सेक्टरच्या अहवालातून ही माहिती हाती येत आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या ५० हजार लोकांपैकी ३० टक्के प्रोग्रॅमर्स आणि डेव्हलपर्स आहेत.

२०१९ मध्ये गेमिंग क्षेत्राने ७ हजार ३७ कोटींची उलाढाल झाली तर २०२२ मध्ये यात वाढ होऊन या क्षेत्राने जवळपास १४ हजार कोटींची उलाढाल केली आहे. टीम लिज डिजीटलच्या गेमिंग - टुमारोज ब्लॉकबस्टर या संशोधनानुसार, या क्षेत्रात २०२६ पर्यंत ३८ हजार ९७ कोटींपर्यंतची उलाढाल शक्य आहे आणि येत्या सात वर्षांत यामध्ये पाच टक्क्यांनी वाढ होणार आहे. याच संस्थेतले पदाधिकारी सुनील चेमामनकोटील यांनी सांगितलं की, गेमिंग इंडस्ट्रीमध्ये वाढत्या युजर बेसमुळे आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे हे क्षेत्र रोजगाराच्या आणखी संधी उपलब्ध करून देणार आहे. २०२३ मध्ये हे क्षेत्र एक लाख रोजगार मिळवून देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

एका सर्वेक्षणानुसार, येत्या काळात या क्षेत्रामध्ये प्रोग्रॅमिंग, गेम डेव्हलपर्स, युनिटी डेव्हलपर्स, टेस्टींग, अॅनिमेशन, डिझाईन, आर्टिस्ट यातल्या तज्ज्ञांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. या क्षेत्रामध्ये सध्या महिलांचं प्रमाण ४० टक्क्यांहून जास्त आहे आणि नेतृत्वाची पदं महिलांकडे आहे. गेम प्रोड्युसर्सला प्रतिवर्षी १० लाख रुपये पगार मिळतो, तर गेम डिझायनर्सला ६.५ लाख, सॉफ्टवेअर इंजिनीयरला ५.५ लाख, गेम डेव्हलपर्स आणि टेस्टर्सला साधारण साडेपाच लाख रुपये प्रति वर्षी असं पॅकेज आहे.

टॅग्स :Online gaming