esakal | जागतिक तिरंदाजी स्पर्धेत कोमलिका बारीसने पटकावले सुवर्णपदक
sakal

बोलून बातमी शोधा

कोमलिका बारीस

तिने कॅडेट मुलींच्या गटात रिकर्व्ह प्रकारात ही कामगिरी केली.

जागतिक तिरंदाजी स्पर्धेत कोमलिका बारीसने पटकावले सुवर्णपदक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोमलिका बारीने जागतिक युवा तिरंदाजीत सुवर्णपदक जिंकले. तिने कॅडेट मुलींच्या गटात रिकर्व्ह प्रकारात ही कामगिरी केली. भारतीय तिरंदाजी संघटनेवरील बंदी कायम राहिल्यास यानंतरच्या स्पर्धेत भारतीय आपल्या ध्वजाखाली खेळू शकणार नाहीत, त्यापूर्वीच्या स्पर्धेत कोमलिकाने हे यश मिळवले. त्यापूर्वी भारताने कम्पाऊंडच्या मिश्र दुहेरीतही बाजी मारली होती. 

माद्रिदला झालेल्या या स्पर्धेत कोमलिकाने निर्णायक फेरीत जपानच्या वॅका सोनोदा हुला 7-3 असे पराजित केले. त्यापूर्वी कोमलिकाने कोरियाच्या मुलीस उपांत्य फेरीत शूटऑफवर हरवले होते. तिने ही लढत 1-5 पिछाडीनंतर जिंकली होती. अंतिम फेरीत पहिले दोन सेट जिंकत कोमलिकाने 4-0 आघाडी घेतली. तिसरा सेट बरोबरीत सुटला आणि चौथा सेट कोमलिकाने गमावला, पण सतरावर्षीय कोमलिकाने निर्णायक सेटमध्ये मोक्‍याच्यावेळी खेळ उंचावला. तिने हा सेट 29-28 जिंकला आणि आपल्या पहिल्याच जागतिक स्पर्धेत विजेतेपद जिंकले. 

मार्की रागिणी आणि सुखबीर सिंगने स्वित्झर्लंडच्या जानिन हुनस्पेरगेर आणि आंद्रेई वॅलेरो यांना 152-147 असे हरवत कम्पाऊंडच्या कुमार गटातील मिश्र दुहेरीत बाजी मारली होती. भारतीयांनी भक्कम सुरुवात करीत अखेरपर्यंत आघाडी राखली.

भारतीयांनी पहिल्या सेटमध्ये दोनदा, दुसऱ्या सेटमध्ये तीनदा अचूक लक्ष्यवेध केला. भारतीयांनी पहिले दोन सेट 38-36, 39-37 असे जिंकले होते, त्यानंतरचा सेट 36-37 गमावला, पण त्यावेळीही त्यांच्या एकंदरीत पाच गुणांची आघाडी होती. त्यांनी ही आघाडी त्यानंतर गमावली नाही. 
 

 
 

loading image
go to top