National Voters' Day : भारताचा सर्वात खर्चिक मतदार! जाणून घ्या असं का?

भारत शासन फक्त एका मतदारसाठी म्हणून एक वोटिंग बूथ उघडतं.
National Voter's Day
National Voter's Dayesakal
Updated on

India's Expensive Voter: मतदान करणं हे प्रत्येका भारतीयाचं नागरिक म्हणून कर्तव्य आहे. दरवर्षी २५ जानेवारीला मतदारांचे हक्क आणि मतदानाच्या जनजागृतीसाठी भारतात “नॅशनल वोटर्स डे” अर्थात मतदार दिवस साजरा केला जातो. 

National Voter's Day
Trip To Kalasubai : न्यू इयर साठी दोन दिवसांच्या ट्रिपच प्लॅनिंग करत आहात? मग भेट द्या महाराष्ट्राच्या एव्हरेस्टला

जागोजागी मतदानाच्या दिवशी वोटिंग बूथ हे लागतात आणि त्या बूथवर आजूबाजूचे अनेक लोकं येऊन मतदान करत असतात, पण तुम्हाला हे माहिती आहे का की भारत शासन फक्त एका मतदारसाठी म्हणून एक वोटिंग बूथ उघडतं. 

National Voter's Day
Pune Travel : पुण्याजवळ वनडे ट्रीप करायची आहे? चुकवू नये अशी बेडसे लेणी

होय! वाचून आश्चर्य वाटेल कारण एका बाजूला मतदानासाठी लागणाऱ्या रांगा आणि दुसरीकडे फक्त एका माणसाचे मत घेण्यासाठी जमलेले मतदान अधिकारी.. गुजरातच्या गीरच्या जंगलात दरवर्षी हे मतदान केंद्र बनवले जाते, अन् यासाठी तब्बल १५ अधिकारी सकाळी ८ ते संध्याकाळी ६ या वेळेत हजर असतात. सगळे मिळून त्या एका व्यक्तीची वाट बघत असतात. 

National Voter's Day
Winter Friendly Food : हिवाळ्यात बनवा गूळ भाताची हेल्दी आणि टेस्टी रेसिपी

नक्की कोण आहे ही व्यक्ती?

गुजरातमध्ये राहणारे सर्वात खर्चिक मतदार म्हणून भरतदास चंदनदास. भरतदास हे एका मंदिराचे पुजारी होते. त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाने आतापर्यंत स्वतंत्र मतदान केंद्र उभारले आहे.  जुनागढच्या गीर जंगलात बनेज नावाच्या एका मंदिरात ते राहत होते.  मात्र, त्यांचे १ नोव्हेंबर २०१९ रोजी निधन झाले.  

National Voter's Day
Organza Saree Fashion : नवीन साडी विकत घेण्याचा प्लॅन आहे? ऑर्गेन्झा साडी आहे सगळ्यात बेस्ट!

२००२ पासून आयोग भरतदासांची व्यवस्था करत आहे

२०१९ च्या निवडणुकीत महंत भरतदास दर्शनदास यांच्यासाठी निवडणूक आयोगाने स्वतंत्र मतदान केंद्र उभारले होते. तसे, २००२ पासून प्रत्येक निवडणुकीत निवडणूक पंच ५ जणांची टीम पाठवत त्यांच्यासाठी खास बूथची व्यवस्था करत असे.  त्या भागात भरतदास हे एकमेव मतदार होते.. त्यांच्या मतदानानंतरही टीम संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हजर राहून कर्तव्य पूर्ण करत असे.

National Voter's Day
Breakfast History : अन् सुरू झाली नाश्त्याची परंपरा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com