Income Certificate: वार्षिक उत्पन्न तीन रुपये मध्य प्रदेशात उत्पन्न दाखल्यावर उल्लेख
Madhya Pradesh News: मध्य प्रदेशातील रामस्वरूप यांच्या उत्पन्नाच्या दाखल्यावर वार्षिक उत्पन्न केवळ ३ रुपये असल्याचं नमूद होतं. ही तांत्रिक चूक असून त्यात सुधारणा करण्यात आल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
सतना: मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील नायगाव येथील रहिवासी रामस्वरूप यांचा उत्पन्नाचा दाखल सध्या समाज माध्यमांवर चर्चेचा विषय ठरला आहे. रामस्वरूप यांच्या उत्पन्नाच्या दाखल्यावर त्यांचे वार्षिक उत्पन्न हे अवघे तीन रुपये दाखविण्यात आले आहे.