Food Prices Drop: खुशखबर! महागाई घटली! किरकोळ महागाई सहा वर्षांत सर्वांत कमी;घाऊक महागाई दर, वीस महिन्यांत नीचांकी
Monsoon Impact: चांगल्या पावसामुळे अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर घटले असून, जून २०२५ मध्ये किरकोळ महागाई २.१ टक्क्यांवर आली आहे. ही गेल्या सहा वर्षांतील नीचांकी पातळी आहे.
नवी दिल्ली : चांगल्या पावसामुळे भाज्यांसह अन्नधान्याच्या किमती कमी झाल्याने जूनमध्ये किरकोळ महागाई २.१ टक्क्यांवर आली असून, ही गेल्या सहा वर्षांतील नीचांकी पातळी आहे. अन्नधान्याची महागाई जानेवारी २०१९ नंतर या जून महिन्यामध्ये सर्वांत कमी झाली आहे.