Semiconductor
sakal
नवी दिल्ली - ‘सेमीकंडक्टर’ निर्मितीच्या क्षेत्रात देशाने एक महत्त्वाचा टप्पा गाठला असून, पहिली स्वदेशी मायक्रोप्रोसेसर चिप ‘ध्रुव-६४’ चे यशस्वी लाँचिंग झाल्याचे मंगळवारी जाहीर करण्यात आले. देशातील पहिल्या ‘६४ बिट ड्युअल कोर मायक्रोप्रोसेसर’चे लोकार्पण करण्यात आले आहे. हा प्रोसेसर संपूर्णपणे भारतात ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग अर्थात ‘सीडॅक’ने मायक्रोप्रोसेसर विकसन कार्यक्रमांतर्गत ‘डिझाइन’ केला आहे.