
पीटर अल्बर्स यांची इंडिगो एअरलाइनच्या सीईओपदी वर्णी
नवी दिल्ली : इंडिगो एअरलाईनला नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी पदी (CEO)पीटर अल्बर्स यांची नियुक्ती केली आहे. नियामक फाइलिंगमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, अल्बर्स 1 ऑक्टोबर 2022 पासून सीईओ पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. इंडिगोचे सध्याचे सीईओ रोनोजॉय दत्ता 30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होणार आहेत, त्यापूर्वी कंपनीने नवीन सीईओंचे नाव निश्चित केले आहे.
हेही वाचा: महागड्या पेट्रोलपासून मिळणार दिलासा! 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचा केंद्राचा निर्णय
पीटर अल्बर्स सध्या KLM रॉयल डच एअरलाइन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी असून, ते 1 ऑक्टोबरपासून इंडिगो एअरलाइन्सची सूत्रे हाती घेतील, असे इंडिगोने बुधवारी जाहीर केले आहे. 71 वर्षीय दत्ता यांची जानेवारी 2019 मध्ये इंडिगोच्या सर्वोच्च पदावर नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, अल्बर्स यांचा अनुभव इंडिगोचे भविष्य सुरक्षित आणि उज्ज्वल बनविण्यात मदत करेल असे मत दत्ता यांनी व्यक्त केले आहे.
Web Title: Indigo Appoints Pieter Elbers As Ceo Ronojoy Dutta To Retire
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..