इंडिगोचं चेन्नई-दुबई विमान बॉम्बनं उडवण्याची धमकी; सहा तास उशीरानं उड्डाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

indigo plane emergency landing in karachi

इंडिगोचं चेन्नई-दुबई विमान बॉम्बनं उडवण्याची धमकी; सहा तास उशीरानं उड्डाण

चेन्नई : इंडिगो कंपनीचं चेन्नईहून दुबईला जाणारं विमान बॉम्बनं उडवून देण्याची धमकी आल्यानं मोठी खळबळ उडाली होती. या धमकीमुळं या विमानाच्या उड्डाणाला तब्बल सहा तासांचा उशीर झाला. त्यामुळं प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. (IndiGo Chennai Dubai flight bomb threat Flight six hours late)

इंडिगो ही सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशी विमान सेवा देणारी कंपनी आहे. या धमकीबाबत माहिती देताना कंपनीकडून सांगण्यात आलं की, विमान उडवून देण्याची धमकी आली होती. पण या धमकीनुसार धोक्याची शहानिशा केल्यानंतरच विमानाला टेकऑफची परवानगी देण्यात आली.

प्रोटोकॉलनुसार, इंडिगोचं विमान 6E 65 जे चेन्नईहून दुबईला जाणार होतं ते विमान उडवून देण्याची धमकीचा कॉल आल्यानं त्याच्या उड्डाणाला उशीर झाला. यानंतर प्रोटोकॉलनुसार विमान रिमोट बे मध्ये नेण्यात आलं. त्यानंतर या धमकीची शहानिशा करण्यात आली. त्यानंतर सहा तासांनंतर या विमानानं चेन्नईहून उड्डाण केलं, असं कंपनीकडून सांगण्यात आलं.

टॅग्स :Desh newsIndigo Airline