

इंडिगोवरील संकट अजन संपलेले नाही. याचा परिणाम दिल्ली विमानतळावरही जाणवत आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगोची १०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत, ज्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज दिल्ली विमानतळावर इंडिगोच्या किमान १०९ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. दरम्यान शनिवारी डीजीसीएने इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स आणि सीओओ आणि अकाउंटेबल मॅनेजर इसिड्रो पोर्केरास यांना नोटीस बजावली आणि २४ तासांच्या आत परिस्थितीचे स्पष्टीकरण मागितले.