

indigo flight cancellation
esakal
indigo flight latest update: देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोला नवीन सुरक्षा नियमांमुळे सलग तिसऱ्या दिवशी क्रू (कर्मचारी) कमतरतेचा सामना करावा लागतोय. याचा थेट परिणाम इंडिगोच्या विमान उड्डाणांवर झालाय. गुरुवारी दिल्ली, मुंबईसह १० हून अधिक विमानतळांवर इंडिगोची ३०० हून अधिक विमाने रद्द करण्यात आली आहेत. पीटीआयने ही माहिती दिली.