IndiGo Flight: इंडिगो विमानसेवा कोलमडल्याप्रकरणी सीईओला डीजीसीएचे समन्स; सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश
DGCA Notice: डीजीसीएने ‘इंडिगो’ सीईओ पीटर एल्बर्स यांना विमानसेवा अडचणीसंदर्भात अहवाल सादर करण्यास आदेश दिले. रद्द झालेल्या उड्डाणांची माहिती व नुकसानभरपाई याबाबत तपशील मागवण्यात आला.
नवी दिल्ली : ‘इंडिगो’ कंपनीची विमानसेवा कोलमडल्याप्रकरणी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) ‘इंडिगो’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पीटर एल्बर्स यांना उद्या, गुरुवारी (ता. ११) नियामकांसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.