IndiGo Delhi to Belagavi Flight
esakal
बेळगाव / बंगळूर : नवी दिल्लीहून बेळगावला येणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाला (IndiGo Delhi to Belagavi Flight) सुमारे चार तासांचा मोठा विलंब झाल्याने २१ मंत्री, आमदार आणि इतर लोकप्रतिनिधींना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. दिल्लीहून जाणारे विमान मंगळवारी सकाळी ८.१५ वाजता बेळगावच्या सांबरा विमानतळावर (Sambra Airport) पोहोचणे अपेक्षित होते.