
छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील स्वामी विवेकानंद विमानतळावर गोंधळ उडाला. दिल्लीहून रायपूरला आलेल्या इंडिगो विमानाचे गेट तांत्रिक बिघाडामुळे बंद झाले. दुपारी २:२५ वाजता विमान रायपूरमध्ये सुरक्षितपणे उतरले. परंतु गेट न उघडल्याने प्रवासी सुमारे ४० मिनिटे विमानात अडकले होते. या विमानात छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, आमदार चतुरी नंद आणि रायपूरच्या महापौर मीनल चौबे यांच्यासह शेकडो प्रवासी होते.