esakal | दुसऱ्यांदा आई होणाऱ्यास सहा हजार रुपये; राजस्थानात इंदिरा गांधी मातृत्त्व पोषण योजना 
sakal

बोलून बातमी शोधा

pregnancy

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काल नव्या योजनेची घोषणा केली. यानुसार दुसऱ्यांदा आई होणाऱ्या महिलेस सरकारकडून ६ हजार रुपये दिले जाणार आहेत.

दुसऱ्यांदा आई होणाऱ्यास सहा हजार रुपये; राजस्थानात इंदिरा गांधी मातृत्त्व पोषण योजना 

sakal_logo
By
पीटीआय

जयपूर - दुसरे मूल होणाऱ्या महिलेस राजस्थान सरकारकडून ६ हजार रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गुरुवारी केली. इंदिरा गांधी मातृत्त्व पोषण असे या योजनेचे नाव असून योजनेच्या लाभार्थ्यांना थेट खात्यात पैसे मिळणार आहेत. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काल नव्या योजनेची घोषणा केली. यानुसार दुसऱ्यांदा आई होणाऱ्या महिलेस सरकारकडून ६ हजार रुपये दिले जाणार आहेत. माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त गेहलोत यांनी एका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून इंदिरा गांधी मातृत्त्व पोषण योजनेची सुरवात केली. त्यात म्हटले की, या योजनेमुळे केवळ कुपोषणाचा सामना होणार नाही तर नागरिकांना एका आईच्या आरोग्याचे महत्त्व पटेल आणि बालकाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी जनजागृति होण्यास हातभार लावेल. गर्भवतीला पोषक आहार मिळाल्यास सृदृढ बालक जन्माला येईल हा विचार समोर ठेवूनच योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. ही योजना सुरवातीला मागासलेले चार जिल्हे उदयपूर, बांसवाडा, डुंगरपूर आणि प्रतापगड येथे लागू केली आहे. ही योजना मदर ॲड चाइल्ड न्यूट्रिशियन इंडिकेटर्सच्या रॅकिंगवर आधारित असेल. या योजनेबाबत आपण मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहरणार असल्याचे सांगून ही योजना संपूर्ण देशात लागू करावी, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. या योजनेमुळे दरवर्षी ७७ हजाहून अधिक महिलांना लाभ मिळणार आहे. यासाठी वार्षिक रुपाने ४३ कोटींची तरतूद करावी लागणार आहे. महिला आणि बाल विकास मंत्री ममता भूपेश म्हणाल्या की, इंदिरा गांधी मातृ पावन योजनेचा उद्देशच प्रामुख्याने गर्भवती आणि नवजात बालकांची तीन वर्षांपर्यंत पोषण आहार मिळावा, असा आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा