1980s चा ट्रेंड फॉलो केला... पण तेव्हाचा हा वादळी राजकीय किस्सा वाचा... सत्ता, पराभव, जेल अन् इंदिरा गांधींचं कमबॅक

1980 Lok Sabha Election: How Indira Gandhi Made a Comeback : १९८० मध्ये इंदिरा गांधींनी दमदार राजकीय कमबॅक करत पुन्हा देशाची सत्ता मिळवली आणि भारतीय राजकारणाची दिशा बदलली.
Indira Gandhi addressing the public during her political comeback, highlighting her return to power after the 1980 Lok Sabha election

Indira Gandhi addressing the public during her political comeback, highlighting her return to power after the 1980 Lok Sabha election

esakal

Updated on

१९८० मध्ये तुम्ही कसे दिसता, हे बघितलं... पण तेव्हाचे किस्से देखील वादळी होते. त्यामुळे १९८० मधील राजकारण समजून घेणं देखील गरजेचं आहे. १९७७ सालची लोकसभा निवडणूक भारतीय राजकारणाच्या इतिहासात एक मोठा टर्निंग पॉइंट ठरली. आपत्कालीन काळानंतर (जून १९७५ ते मार्च १९७७) देशभरात इंदिरा गांधींच्या सरकारविरोधात प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. जबरदस्तीची नसबंदी मोहीम, पत्रकारांना तुरुंगात टाकणे, विरोधकांना अटक करणे आणि मूलभूत हक्कांचे उल्लंघन यामुळे जनता संतप्त झाली होती. त्या निवडणुकीत काँग्रेसला मोठा पराभव पत्करावा लागला. जनता पक्षाने सत्ता काबीज केली आणि इंदिरा गांधी प्रथमच सत्तेबाहेर गेल्या. रायबरेलीतूनही त्यांना पराभव पत्करावा लागला. अनेकांना वाटले की इंदिरा गांधींची राजकीय कारकीर्द संपली आहे. त्या राजकीय वाळवंटात गेल्या होत्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com