इंदिरा जयसिंह यांच्या माफीबाबतच्या वक्तव्यावर निर्भयाची आई म्हणाली...

वृत्तसंस्था
Saturday, 18 January 2020

मला हा सल्ला देणाऱ्या इंदिरा जयसिंह कोण आहेत? माझ्या मुलीवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी व्हावी, अशी पूर्ण देशाची इच्छा आहे. अशा लोकांमुळेच देशात बलात्कार पिडीतांना न्याय मिळत नाही.

नवी दिल्ली : ज्येष्ठ महिला वकील इंदिरा जयसिंह यांनी दिल्लीत सामुहिक बलात्कार झालेल्या निर्भयाची आईने बलात्काऱ्यांना माफी देण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर तिच्या आईने त्यांचे असे बोलण्याचे धाडसच कसे झाले असे म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इंदिरा जयसिंह यांनी ट्विट करत म्हटले होते, की ज्या पद्धतीने सोनिया गांधी यांनी राजीव गांधी यांची मारेकरी नलिनीला माफ केलं आणि तिला फाशी देऊ नये अशी मागणी केली होती तसेच निर्भयाच्या आईनेही करावे. मला आशादेवी यांच्या वेदनेची पूर्णपणे जाणीव आहे. मात्र मी त्यांना आवाहन करते की त्यांनी सोनिया गांधी यांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवावे. सोनिया यांनी नलिनीला माफ केले होते आणि म्हटले होते की तिला फाशीची शिक्षा होऊ नये. आम्ही तुमच्यासोबत आहोत मात्र फाशीच्या शिक्षेविरोधात आहोत.

राहुल गांधींना निवडून केरळमधील जनतेने चूक केली : रामचंद्र गुहा

याविषयी बोलताना निर्भयाची आई आशादेवी म्हणाल्या, की मला हा सल्ला देणाऱ्या इंदिरा जयसिंह कोण आहेत? माझ्या मुलीवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी व्हावी, अशी पूर्ण देशाची इच्छा आहे. अशा लोकांमुळेच देशात बलात्कार पिडीतांना न्याय मिळत नाही. इंदिरा जयसिंह यांचे असे बोलण्याचा धाडसच कसे झाले, यावर माझा विश्वास बसत नाही. मला कधी त्या विचारण्यास आल्या नाहीत आणि आज थेट त्यांच्या माफीची मागणी करत आहेत.  

‘निर्भया’ सामूहिक बलात्कार आणि हत्ये प्रकरणी चार दोषींना 1 फेब्रुवारीला पहाटे 6 वाजता तिहार तुरुंगात फासावर लटकवले जाणार आहे. यापूर्वी 22 जानेवारीला या नराधमांना फाशी देण्यात येणार होती. मात्र कायदेशीर प्रक्रियेमुळे फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी पुढे ढकलली आहे. चार नराधमांपैकी एक मुकेश सिंहने केलेला दयेचा अर्ज दिल्लीच्या नायब राज्यपालांनी शुक्रवारी फेटाळला होता. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही दयेचा अर्ज फेटाळला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indira Jaising tweets on Nirbhaya case appeal to her mother to forgive to convicts