esakal | राहुल गांधींना निवडून केरळमधील जनतेने चूक केली : रामचंद्र गुहा
sakal

बोलून बातमी शोधा

Ramchandra Guha

भारतात हिंदुत्वाचा उदय होत असल्यामुळेच हे घडत आहे. मल्याळी जनतेने 2024 मध्ये राहुल गांधींना निवडून देण्याची चूक करू नका. तसे केल्यास राहुल गांधी हे नरेंद्र मोदींना फायदाच पोहोचवतील. मोदी हे स्वनिर्मित आहेत. त्यांनी 15 वर्षे एका राज्याचे नेतृत्व केले आहे. 

राहुल गांधींना निवडून केरळमधील जनतेने चूक केली : रामचंद्र गुहा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

कोझिकोड : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळमधील कोझिकोड लोकसभा मतदारसंघातून निवडून केरळमधील जनतेने चूक केल्याचे, ज्येष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केरळ साहित्य संमेलनात बोलताना गुहा यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले आहे. 'राष्ट्रभक्ती विरुद्ध अंधराष्ट्रीयता' या विषयावर बोलताना गुहा यांनी विविध विषयांवर भाष्य केले.

वंचित शेतकऱ्यांना दिलासा

गुहा म्हणाले, की व्यक्तिगतरित्या मी राहुल गांधी यांच्या विरोधात नाही. राहुल सभ्य आहेत. चांगले व्यक्ती आहेत. पण सध्याचा यंग इंडिया पाचव्या पिढीच्या वंशजाला स्वीकारत नाही. त्यामुळे तुम्ही राहुल गांधी यांना निवडून का दिलंत? त्यांना संसदेत का पाठवलं? असा सवाल करतानाच राहुल गांधी यांना निवडून देणं ही केरळच्या जनतेची भयंकर चूक आहे. कठोर परिश्रम करणारे आणि सेल्फ मेड पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर पाचव्या पिढीतील राहुल गांधींचा निभाव लागूच शकत नाही. एका महान राजकीय पक्षाचं दयनीय फॅमिली फर्ममध्ये रुपांतर झाली आहे. भारतात हिंदुत्वाचा उदय होत असल्यामुळेच हे घडत आहे. मल्याळी जनतेने 2024 मध्ये राहुल गांधींना निवडून देण्याची चूक करू नका. तसे केल्यास राहुल गांधी हे नरेंद्र मोदींना फायदाच पोहोचवतील. मोदी हे स्वनिर्मित आहेत. त्यांनी 15 वर्षे एका राज्याचे नेतृत्व केले आहे. 

loading image