Indo-Aus Trade Deal : `विद्यार्थ्यांना वर्क व्हिसा, १० लाख रोजगार मिळणार’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Piyush Goyal

‘भारत-ऑस्ट्रेलिया व्यापार करारातून विद्यार्थ्यांना वर्क व्हिसा, १० लाख रोजगार मिळणार’

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार (ECTA) पुढील चार ते पाच वर्षांमध्ये सुमारे दहा लाख रोजगार निर्माण करण्यास मदत करेल. तसेच भारतीय विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियात काम करण्यासाठी वर्क व्हिसा दिला जाईल, असे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी गुरुवारी (ता. ७) सिडनी येथे एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले. (Indo-Australia trade agreement will provide work visas, 10 lakh jobs to students)

आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार (Indo-Aus Trade Deal) हा एका दशकाहून अधिक काळानंतर विकसित देशासोबतचा भारताचा पहिला व्यापार करार आहे. हा करार दोन्ही देशांमधील व्यापाराला चालना देण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा प्रदान करतो. ऑस्ट्रेलियासोबतचा व्यापार करार नवीन मार्ग उघडेल. एका विकसित देशासोबत मुक्त व्यापार करारावर पोहोचलो आहोत. भारतीय उद्योग स्पर्धा करण्यासाठी तयार आहे. आमची पोहोच वाढली आहे. आम्ही इतिहासात आतापर्यंतची सर्वोच्च निर्यात केली आहे, असेही पीयूष गोयल (Piyush Goyal) म्हणाले.

हेही वाचा: चीनमध्ये विचित्र मार्गदर्शक तत्त्वे जारी; म्हणते एकत्र झोपू नका अन्...

भारत (India) आणि ऑस्ट्रेलियाने २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार सुमारे शंभर अब्जापर्यंत डॉलरपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे, असे पीयूष गोयल बुधवारी मेलबर्नच्या भेटीदरम्यान म्हणाले. दोन्ही देशांमधील करारामुळे निर्माण झालेल्या संधींचा शोध घेण्यासाठी गोयल हे मेलबर्न, सिडनी व पर्थ येथे व्यावसायिक शिष्टमंडळाचे नेतृत्व करीत आहे. ते तीन दिवसीय ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहेत.

एका दशकात विकसित देशासोबत भारताचा पहिला व्यापार करार

आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार हा एका दशकात विकसित देशासोबत भारताचा पहिला व्यापार करार आहे. हा करार दोन्ही देशांमधील व्यापाराला चालना देण्यासाठी संस्थात्मक यंत्रणा प्रदान करतो. ऑस्ट्रेलिया (Australia) हा भारताचा १७ वा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार आहे. भारत हा ऑस्ट्रेलियाचा ९वा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार आहे.

दुहेरी पदवी कार्यक्रम लवकरच

सिडनी येथील न्यू साउथ वेल्स विद्यापीठाच्या मंत्र्याने शिक्षण क्षेत्राला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पूल म्हटले आहे. दोन्ही देश लवकरच विद्यार्थ्यांसाठी दुहेरी पदवी कार्यक्रम सुरू करतील अशी घोषणा केली. आंतरदेशीय दुहेरी प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मानकांनुसार काही वर्षे एका देशात आणि काही वर्षांसाठी दुसऱ्या देशात अभ्यासक्रम घेण्याची परवानगी असेल.

आठ वर्षांत प्रत्येक क्षेत्रातील व्यापार चौपट करण्याकडे लक्ष

माझ्या मतानुसारर आपण प्रत्येक क्षेत्राचा धांडोळा घेणे आवश्यक असून त्यांची वाढ कशी होत आहे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. २०३० पर्यंत शंभर बिलियन डाॅलर्सचे लक्ष्य गाठण्याची महत्वाकांक्षा बाळगायला हवी. त्यामुळे येत्या आठ वर्षांत प्रत्येक क्षेत्रातील व्यापार चौपट करण्याकडे आपले लक्ष आहे, असेही पीयूष गोयल म्हणाले.

४१८ अब्ज डॉलरची निर्यात

भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी २ एप्रिल रोजी आर्थिक सहकार्य आणि व्यापार करारवर स्वाक्षरी केली. ऑस्ट्रेलियासोबत नव्याने स्वाक्षरी केलेल्या व्यापार करारामुळे पुढील पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापार विद्यमान USD २७ अब्ज वरून USD ४५ ते ५० अब्जापर्यंत नेण्याची अपेक्षा आहे. भारताने या वर्षात आपल्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वाधिक ४१८ अब्ज डॉलरची निर्यात केली आहे. यावरून हे दिसून येते की भारत आता जगाशी संबंध ठेवण्यास तयार आहे, असेही पीयूष गोयल म्हणाले.

Web Title: Indo Aus Trade Deal Jobs Work Visa For Students Piyush Goyal

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top