भारत-नेपाळ रेल्वे पुन्हा सुरू

आज दुपारी १२.३० वाजता जयनगरहून निघालेली रेल्वे दुपारी अडीच वाजता जनकपूर येथे पोचली
Indo-Nepal Railway start again Narendra Modi Sher Bahadur Deuba
Indo-Nepal Railway start again Narendra Modi Sher Bahadur Deubasakal

नवी दिल्ली/पाटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान शेरबहादूर देऊबा यांनी दिल्लीच्या हैदराबाद हाऊस येथून भारत आणि नेपाळ यांच्यादरम्यान नव्या रेल्वेसेवेला हिरवा झेंडा दाखवला. आज दुपारी १२.३० वाजता जयनगरहून निघालेली रेल्वे दुपारी अडीच वाजता जनकपूर येथे पोचली. दोन तास प्रवास करणाऱ्या रेल्वेचे ठिकठिकाणी आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले.

२०१४ पासून जयनगर ते जनकपूर दरम्यान रेल्वे सेवा बंद होती. २०१४ पर्यंत नेपाळ नॅरोगेजवर रेल्वे धावली. परंतु प्रवासाला बराच काळ लागत असल्याने कोळसा अधिक लागत होता. त्यामुळे रेल्वेसेवा बंद करण्यात आली. भारत- नेपाळ यादरम्यान झालेल्या रेल्वेमार्गासाठी ८०० कोटी रुपयांचा खर्च आला. भारतातून नेपाळला जाण्यासाठी केवळ साडेबारा रुपये मोजावे लागणार आहे. जयनगरहून इनर्व्हाला जाण्याचे भाडे १२.५० रुपये, खजुरी जाण्यासाठी १५.६० रुपये, महिनाथपूर येथे जाण्यासाठी २१.८७ रुपये, वैदेहीला जाण्यासाठी २८.२५ रुपये, परवाहाला जाण्यासाठी ३४ रुपये, जनकपूरला जाण्यासाठी ४३.७५ रुपये आणि कुर्थाला जाण्यासाठी ५६.२५ रुपये भाडे मोजावे लागणार आहे.

पंतप्रधान देऊबा आणि आपण व्यापार पातळीवर सर्व प्रकारचे सीमापार संपर्क वाढविण्यावर भर देण्यावर सहमती दर्शविली आहे. जयनगर (भारत) आणि कुर्था (नेपाळ) दरम्यानची रेल्वेसेवा हा याचाच एक भाग आहे. उभय देशांतील लोकांचा प्रवास हा कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण होण्यास अशा प्रकारच्या योजना मोलाची भूमिका बजावतील.

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com