उद्योजकासाठी 31 डिसेंबरची रात्र ठरली अखेरची; कुटुंबियांसह 6 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
बुधवार, 1 जानेवारी 2020

इन्दूरजवळील महू येथे पुनीत अग्रवाल यांच्यासह पत्नी, मुलगी, जावई आणि नातूसह सेलिब्रेशनसाठी आले होते. यावेळी या सहा जणांसह सात जण लिफ्टमधून प्रवास करत असताना अचानक लिफ्टची दोर तुटल्याने 80 फुटांवरून ती खाली कोसळली.

महू : मध्य प्रदेशातील महू येथे प्रसिद्ध उद्योजक पुनीत अग्रवाल यांच्या कुटुंबियांसाठी 31 डिसेंबरची रात्र काळरात्र म्हणून आली. कारण, लिफ्ट कोसळून त्यांच्या कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इन्दूरजवळील महू येथे पुनीत अग्रवाल यांच्यासह पत्नी, मुलगी, जावई आणि नातूसह सेलिब्रेशनसाठी आले होते. यावेळी या सहा जणांसह सात जण लिफ्टमधून प्रवास करत असताना अचानक लिफ्टची दोर तुटल्याने 80 फुटांवरून ती खाली कोसळली. यामध्ये पुनीत यांच्यासह सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. 

राजकारणापासून आम्ही नेहमी दूर असतो : बिपीन रावत

मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत त्यांच्या पत्नी जखमी झाल्या असून, त्यांच्यावर इन्दूरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लिफ्टचालक रिमोटवरून चालवत असताना ही दुर्घटना घडली. इमारतीचे बांधकाम खाली-वर करण्यासाठीही ही लिफ्ट वापरण्यात येत होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indore 6 family members of industrialist Punit Agarwal is Died