
मध्य प्रदेशातील इंदूर शहरात आज (शनिवार) एका हायप्रोफाइल प्रकरणाने खळबळ उडाली. क्राइम ब्रांचच्या पथकाने भाजप नेते आणि माजी अल्पसंख्याक आयोग सदस्य कमाल खान यांचा मुलगा माज खान याला ड्रग्ज प्रकरणात अटक केली. माज खानवर ड्रग्जच्या अवैध व्यापारात सहभागी असल्याचा आरोप आहे. याशिवाय, त्याने पोलिसांवर गाडी चढवून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही ठेवण्यात आला आहे. या घटनेने शहरात चर्चेला उधाण आले आहे.