
इंदौर: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने चोरट्यांसमोर हुशारीने झोपण्याचे नाटक करून स्वतःचा जीव वाचवला आहे. रात्री उशिरा काही चोर एका घरात घुसले होते. अशा परिस्थितीत लोक घाबरतात, पण या व्यक्तीने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे. ही संपूर्ण घटना एका व्हिडीओमध्ये कैद झाली असून, तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.