Indrani Mukherjee : इंद्राणी मुखर्जीला विशेष सीबीआय कोर्टातून जामीन मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंद्राणी मुखर्जीला विशेष सीबीआय कोर्टातून जामीन मंजूर

इंद्राणी मुखर्जीला विशेष सीबीआय कोर्टातून जामीन मंजूर

शीना बोरा हत्याकांड (Murder) प्रकरणातून बुधवारी (ता. १८) इंद्राणी मुखर्जी (Indrani Mukherjee) हिला सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. साडेसहा वर्षांनंतर हा जामीन मंजूर करण्यात आला. इंद्राणी मुखर्जी सध्या मुंबईतल्या भायखळा तुरुंगात आहे. गुरुवारी (ता. १९) तिला विशेष सीबीआय कोर्टातून दोन लाखांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. (Indrani Mukherjee granted bail on caste bond of Rs 2 lakh)

इंद्राणी मुखर्जीचा जामीन अनेकदा फेटाळण्यात आला होता. मुंबई सत्र न्यायालय, उच्च न्यायालयाने तिचा जामीन मंजूर केला नव्हता. कारण, तिच्यावर मुलगी शीना बोरा (Sheena Bora) हिची पूर्व पती व ड्रायव्हर यांच्या मदतीने हत्या (Murder) केल्याचा आरोप होता. यात तिचा पती पीटर मुखर्जीचाही हात होता. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला होत्या.

इंद्राणी मुखर्जीने (Indrani Mukharjee) एकही पॅरोल घेतला नव्हता. याच सगळ्या गोष्टी लक्षात घेत सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी तिला जामीन दिला होता. यामुळे इंद्राणी मुखर्जीला मोठा दिलासा मिळाला आहे. गुरुवारी (ता. १९) इंद्राणी मुखर्जीला दोन लाखांच्या जात मुचलक्यावर विशेष सीबीआय कोर्टातून जामीन मंजूर करण्यात आला आहे.

रक्कम भरण्यास दोन महिन्यांचा वेळ हवा

तिचा वकील सना खानकडून रक्कम कमी होईल का अशी मागणी करण्यात आली. जात मुचलक्याची रक्कम एक लाख करावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली. तसेच रक्कम भरण्यास दोन महिन्यांचा वेळ मिळावा अशीही मागणी करण्यात आली. साडेसहा वर्षांपासून इंद्राणी मुखर्जी जेलमध्ये आहे. त्यामुळे रक्कम भरण्यास वेळ मिळावा अशी मागणी वकिलाकडून करण्यात आली.