हातपाय नसलेला चालवतो जुगाड गाडी; आनंद महिंद्रांनी दिली जॉबची ऑफर

हातपाय नसलेला चालवतो जुगाड गाडी; आनंद महिंद्रांनी दिली जॉबची ऑफर

नवी दिल्ली : आनंद महिंद्रा (Anand Mahindra) नेहमीच आपल्या ट्विट्सवरुन चर्चेत असतात. हटके आणि जगावेगळे व्हिडीओ शेअर करुन त्यांना कौतुकाची थाप देण्याचा पायंडा एक उद्योगपती म्हणून त्यांनी पाडला आहे. खासकरुन ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये काही वेगळ्या गोष्टी करु पाहणाऱ्या लोकांना ते नेहमीच प्रोत्साहन देताना दिसतात. आज महिंद्रांनी असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो पाहून तुम्हीही हैराण व्हाल. या व्हिडीओमध्ये एक असा व्यक्ती ज्याला ना हात आहेत ना पाय आहेत, तो त्याने बनवलेली जुगाड गाडी चालवताना दिसतो आहे. या गाडीला स्कूटीचं इंजिन असून ती मॉडिफाय केलेली गाडी आहे. एका व्यक्तीने या दिव्यांगाची मुलाखत घेतल्याचं दिसून येतंय. त्याने गाडी चालवून देखील दाखवली आहे. आनंद महिंद्रांनी त्याचा व्हिडीओ शेअर करत कौतुक केलंय. इतकंच नव्हे तर त्याला नोकरीचीही ऑफर दिली आहे. (Industrialist Anand Mahindra)

हातपाय नसलेला चालवतो जुगाड गाडी; आनंद महिंद्रांनी दिली जॉबची ऑफर
Punjab: चंडीगड महापालिकेत 'आप'चा जलवा; महापौराला हरवून विजयी मुसंडी

या व्हिडीओमध्ये तो व्यक्ती सांगतो की, मला बायकोही आहे. दोन लहान मुले आहेत. त्यामुळे मी बाहेर कामाला जातो. गेल्या पाच वर्षांपासून मी ही गाडी चालवतो, असंही तो व्यक्ती सांगताना दिसतो. त्याचा व्हिडीओ काढून त्याच्या या जिद्दीबाबत कौतुक केल्यानंतर त्या दिव्यांग व्यक्तीने एक निर्मळ स्मितहास्य देऊन देवाचे आभारही मानले.

हा व्हिडीओ आनंद महिंद्रांनी ट्विटरवर शेअर करत म्हटलंय की, हा व्हिडीओ कुठे शूट केलाय, ते त्यांना माहिती नाही. आज माझ्या टाइमलाइनवर मला हा मिळाला. हा व्हिडीओ किती जुना आहे किंवा तो कुठला आहे हे माहित नाही, परंतु या व्यक्तीने मला आश्चर्यचकित केले आहे. ज्या व्यक्तीने केवळ आपल्या अपंगत्वाशी दोन हात केला नाहीये तर त्याच्याकडे जे काही आहे त्याबद्दलही तो कृतज्ञ आहे. राम, लास्ट माईल डिलिव्हरीसाठी त्याला बिझनेस असोसिएट बनवू शकतोस का? अशी विचारणाही त्यांनी आपल्या सहकाऱ्याला केली आहे.

आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या या व्हिडीओला 50 हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. गेल्या काही आठवड्यापासून हा व्हिडीओ इंटरनेटवर फिरतो आहे. हा व्यक्ती दक्षिण दिल्लीतील मेहरौली भागात दिसला असल्याचं एका युझरने कमेंटमध्ये म्हटलंय.

हातपाय नसलेला चालवतो जुगाड गाडी; आनंद महिंद्रांनी दिली जॉबची ऑफर
राज्यात 26 ओमिक्रॉन रुग्णांची भर; मुंबईतही नागरिकांना संसर्ग

अगदी काही दिवसांपूर्वीच सांगलीतील देवराष्ट्रेमधील दत्तात्रय लोहार यांनी बनवलेली अनोखी जुगाड जीपचं कौतुक आनंद महिंद्रांनी केलं होतं. घरच्या घरी टाकाऊ वस्तूंपासून बनवलेली एक भन्नाट जीप पाहून महिंद्रांना कौतुक वाटलं आणि त्यांनी या लोहार कुटुंबाला एक ऑफर दिली. ही जीप महिंद्रा रिसर्च व्हॅलीत ठेवण्यासाठी मागितली. या बदल्यात महिंद्रा लोहार कुटुंबाला एक बोलेरो गाडी भेट देण्याची ऑफर दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com