Punjab: चंडीगड महापालिकेत 'आप'चा जलवा; महापौराला हरवून विजयी मुसंडी

arvind kejriwal
arvind kejriwal

चंडीगड : एकीकडे पंजाब विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं असताना दुसरीकडे राज्याची राजधानी चंडीगडच्या महापालिकेत (Chandigarh Municipal Election 2021) मात्र मोठा बदल घडताना दिसून येतोय. या महापालिकांमधील निवडणुकांचा निकाल लागला असून या निवडणुकीत आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. एकूण ३५ जागांपैकी १४ जागांवर आप विजयी झाला आहे. या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. त्यांचे महापौर रविकांत शर्मा यांनाही पराभव स्वीकारावा लागला आहे. (Chandigarh Municipal Corporation Election Results)

arvind kejriwal
महानगरपालिका निवडणुकीत पहिल्यांदाच उतरलेल्या 'आप'ची जबरदस्त आघाडी

आपने मारलेल्या या मुसंडीमुळे राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये याचा पक्षाला फायदा होणार असल्याचं चित्र असून दिवसेंदिवस पक्षाची ताकद वाढताना दिसत आहे. याबाबत बोलताना आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी म्हटलंय की, चंडीगड महापालिकेत आपचा झालेला विजय म्हणजे आगामी बदलाचे संकेत आहेत. चंडीगडच्या नागरिकांनी भ्रष्ट राजकारणाला नाकारत आपच्या इमानदार राजकारणाची निवड केली आहे. यावेळी पंजाब बदलासाठी तयार आहे.

arvind kejriwal
Amul Franchise घ्या अन् महिन्याला लाखो कमवा!

कसं आहे निवडणुकीतील चित्र?

चंडीगड महापालिकेसाठी गेल्या शुक्रवारी निवडणूक झाली होती. त्याची मतमोजणी आज झाली. यात भाजपची पीछेहाट झाली असून पहिल्यांदाच निवडणूक लढविणाऱ्या ‘आप’ला १४ जागा मिळाल्या आहेत. भाजपला १२ तर काँग्रेसला आठ जागांवर समाधान मानावे लागले आहे. शिरोमणी अकाली दलाने एक जागा जिंकली आहे. भाजपचे नेते व महापौर रविकांत शर्मा यांचा ‘आप’चे उमेदवार धमनप्रीतसिंग यांनी ८२८ मतांनी पराभव केला. भाजपचे आणखी एक नेते व माजी महापौर दावेश मौदगिल यांना ‘आप’च्या जसबीर यांच्याकडून ९३९ मतांनी पराभव स्वीकारावा लागला. चंडीगडमधील वॉर्डांची संख्या आधी २६ होती, त्यात २०१६मध्ये वाढ करून ३५ करण्यात आली. महापालिकेच्या दर पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस यांच्यातच दरवेळी प्रमुख लढत होत असे. यावेळी मात्र ‘आप’ने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने तिरंगी लढती झाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com