उद्योगचक्रे ठप्प होण्याची भीती; कामगारांनी शहरे सोडल्याने उद्योगपती हवालदिल 

वृत्तसंस्था
Monday, 4 May 2020

अनेक राज्ये आणि उद्योजकांनी या कामगारांना आहे तिथेच थांबण्याचे आवाहन केले आहे. कामगार शहर सोडून गेला तर लॉकडाउनंतर उद्योगाचे चक्र पुन्हा कोण फिरवणार असा प्रश्न उद्योगजकासमोर निर्माण झाला आहे.

नवी दिल्ली -  देशभरातील विविध औद्योगिक शहरांत लॉकडाउनमुळे अडकून पडलेल्या कामगारांना घेऊन श्रमिक एक्सप्रेस धावू लागल्यानंतर उद्योगपती आणि विविध राज्य सरकारे धास्तावली आहेत. अनेक राज्ये आणि उद्योजकांनी या कामगारांना आहे तिथेच थांबण्याचे आवाहन केले आहे. कामगार शहर सोडून गेला तर लॉकडाउनंतर उद्योगाचे चक्र पुन्हा कोण फिरवणार असा प्रश्न उद्योगजकासमोर निर्माण झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यांच्याकडून थांबण्याचे आवाहन 
कर्नाटक, तेलंगण, हरियाणा आणि दिल्ली 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सध्यातरी कामगारांनी आहे तिथेच राहावे. परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येईल. सरकार आणि उद्योगजगत या कामगारांची काळजी घेईल. 
नितीन गडकरी, केंद्रीयमंत्री 

राज्यांतील अनेक उद्योग सुरू झाले आहेत, आज जे उद्योग सुरू नाहीत ते देखील उद्या सुरू होतील. यामुळे कामगारांनी घरी जाण्याची घाई करू नये. 
मनोहरलाल खट्टर, मुख्यमंत्री, हरियाणा 

राज्य आणि केंद्र सरकार स्थलांतरित कामगारांची योग्य काळजी घेत आहेत, यामध्ये उद्योग जगताने देखील योगदान द्यावे. 
संतोषकुमार गगवार, केंद्रीय श्रममंत्री 
 

आम्ही लवकरच सगळे उद्योग सुरू करणार आहोत. सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना देखील आम्ही कामगारांचे हित जपण्याचे आवाहन केले आहे. कामगारांनी आमचे राज्य सोडून जाऊ नये अशी कळकळीची विनंती आहे. 
बी. एस. येडियुरप्पा, मुख्यमंत्री कर्नाटक 
 

१२ कोटी : देशभरातील स्थलांतरित कामगारांची संख्या 
 

आयटी सिटी ठप्प 
देशातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळूरमध्ये ८ लाख स्थलांतरित कामगार आहेत. आता ही सगळी मंडळी घरी गेल्याने प्रकलपांची कामे ठप्प होणार आहेत. तेलंगणमधील हैदराबादची स्थितीदेखील काही यापेक्षा वेगळी नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: industrialists are worried as the workers left the cities due to coronavirus