Two Month Old Baby Dies After Clash Over Temple Entry
Esakal
देश
मंदिर प्रवेशावरून वादानंतर हल्ला, २ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू; कुटुंबियांचे गंभीर आरोप
Crime News: तेलंगनातील कुम्मेरा इथं मंदिर प्रवेशावेळी वादानंतर झालेल्या हल्ल्यात एक चिमुकली गंभीर जखमी झाली होती. तिचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबियांनी स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
Telangana Crime News: मंदिर प्रवेशावरून वादानंतर झालेल्या हल्ल्यात एका दोन महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. स्थानिक नेत्यांकडून जातीय भेदभाव आणि मारहाण केल्याचा आरोप पीडित कुटुंबियांनी केला आहे. तेलंगनातल्या नगरकुरनूल जिल्ह्यात कुम्मेरा इथं ही घटना घडलीय. मालन्ना यात्रेवेळी मंदिर प्रवेशावरून हा वाद झाला होता.

