पाकिस्तान सापडला 'रंगेहाथ'; काश्मिरमध्ये भुयारामार्गे दहशतवादी करायचे घुसखोरी

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 24 January 2021

सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी शनिवारी कथुआ जिल्ह्याच्या हिरानगर सेक्टरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर आणखी एक भुयार शोधून काढले.

जम्मू- सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी शनिवारी कथुआ जिल्ह्याच्या हिरानगर सेक्टरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर आणखी एक भुयार शोधून काढले. हे भुयार पाकिस्तानने बांधलेले असून या मार्गाने दहशतवादी भारतात घुसखोरी करत असल्याचे बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

गेल्या सहा महिन्यात सांबा आणि कथुआ जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफच्या शोधमोहिमेत आतापर्यंत चार भुयार शोधून काढण्यात आले आहेत. याच सेक्टरमध्ये बोबियान गावात १३ जानेवारी रोजी दीडशे मीटर लांबीचे भुयार शोधले होते. बीएसएफच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पानसार क्षेत्रातील भुयार हे पाकिस्तानच्या बाजूने दीडशे मीटर लांब, तीस फूट खोल आणि तीन फूट व्यासाचे आहे. गेल्यावर्षी जून महिन्यात याच भागात शस्त्रास्त्रांचे वहन करणारे ड्रोन बीएसएफच्या जवानांनी पाडले होते. तसेच नोव्हेंबर २०१९ रोजी याच भागात एका घुसखोराला पकडले होते. 

Farmer Protest: 26 जानेवारीच्या ट्रॅक्टर परेडला पोलिसांची परवानगी; 2 लाख...

पूंॅच जिल्ह्यात शस्त्रसाठा सापडला

पूंॅच जिल्ह्यांत दहशतवाद्यांचे ठिकाण शोधून काढण्यास लष्कराला यश आले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला आहे. हडिगुडा येथील जंगलक्षेत्रात डोबा मोहल्ला येथे तपासणी मोहीम सुरू असताना शस्त्रसाठा सापडला. संबंधित भागात दहशतवादी असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत असताना बीएसएफच्या जवानांना एके-४७ रायफल्स, तीन मॅगझीन, ८२ फैरी, चिनी बनावटीचे पिस्तूल, चार हँडग्रेनेड आढळून आले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Infiltration of Pakistani terrorists Basement found in Kashmir