Farmer Protest: 26 जानेवारीच्या ट्रॅक्टर परेडला पोलिसांची परवानगी; 2 लाख ट्रॅक्टर दिल्लीच्या सीमेवर 

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 24 January 2021

कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना 26 जानेवारी रोजी राष्ट्रीय राजधानीत ट्रॅक्टर रॅली काढण्यासाठी परवानगी दिल्याचा दावा शेतकरी संघटनांनी केला आहे.

नवी दिल्ली- कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना 26 जानेवारी रोजी राष्ट्रीय राजधानीत ट्रॅक्टर रॅली काढण्यासाठी परवानगी दिल्याचा दावा शेतकरी संघटनांनी केला आहे. असे असले तरी पोलिसांचे अतिरिक्त जन संपर्क अधिरारी अनिल मित्तल यांनी शेतकऱ्यांसोबतची याप्रकरणीची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचं म्हटलं आहे. हजारो शेतकरी 26 नोव्हेंबरपासून देशाच्या राजधानीच्या सीमेवर निदर्शने करत आहेत. नवभारत टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 

corona update: कोरोना रुग्णांचा आलेख उतरता; जाणून घ्या आजची आकडेवारी

परेडमध्ये 2 लाखांपेक्षा अधिक ट्रॅक्टर दिसतील

आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या म्हणण्यानुसार परेडमध्ये 2 लाखांपेक्षा अधिक ट्रॅक्टर सहभागी होण्याची शक्यता आहे. रॅलीचे पाच मार्ग असतील. दिल्लीच्या राजपथावर पजासत्ताक दिवस परेड संपल्यानंतर दुपारी 12 वाजता ट्रॅक्टर परेड काढली जाईल. शेतकरी संघटनांचे मुख्य संघटन संयुक्त किसान मोर्चाचे वरिष्ठ सदस्य अभिमन्यु कोहाड यांनी दावा केला की, पोलिसांनी पजासत्ताक दिवशी ट्रॅक्टर रॅली काढण्यासाठी परवानगी दिली आहे. ट्रॅक्टर रॅली दिल्लीच्या गाजीपूर, सिंघू आणि टीकरी सीमेपासून सुरु होईल.

'जय हिंद' किंवा 'वंदे मातरम' म्हणणं म्हणजे राष्ट्रवाद नाही...

शेतकरी नेत्यांनी सांगितलं की पाच मार्गाद्वारे रॅलीचा मंजुरी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर 100 किलोमीटर प्रवास करतील. टीकरी बॉर्डरवर असलेले शेतकरी आपली परेड सुरु करतील आणि नांगलोई, नजफगड, बादली आणि कुंडली-मानेसर-पलवल एक्सप्रेसवे मार्गे रॅली जाईल. 

दरम्यान, दिल्ली-हरियाणा सिंघू सीमेवर शुक्रवारी खळबळजनक खुलासा झाला. सिंघू सीमेवर शेतकरी नेत्यांनी एका शार्प शूटरला पकडल्याचा दावा केला. या शूटरचा चेहरा झाकून त्याला प्रसारमाध्यमांसमोर उभे करण्यात आले होते. हा शूटर मोठा घातपात करणार होता असा दावा या शेतकऱ्यांनी केला आहे. पकडलेल्या शूटरने माध्यमांसमोर दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. दि. 26 जानेवारीला ट्रॅक्टर रॅलीदरम्यान तो 4 शेतकरी नेत्यांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या करणार होता, असा दावा या शेतकऱ्यांनी केला आहे. 

शुक्रवारी रात्री उशिरा सिंघू सीमेवर पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांनी या संशयिताला समोर आणले. ट्रॅक्टर रॅलीदरम्यान पोलिसांसाच्या वेशात शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करुन गोंधळाचे वातावरण निर्माण करणार होतो, असा दावाही पकडण्यात आलेल्या व्यक्तीने केला. विशेष म्हणजे या शूटरने जाट आंदोलनावेळी वातावरण बिघडवण्याचे काम केल्याचे कबूल केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 26 January kisan parade farmer leaders over 2 lakh tractors will be part