हाथरसमध्ये 'आप'च्या खासदारांवर फेकली शाई

वृत्तसंस्था
Monday, 5 October 2020

हाथरस येथे पीडित युवतीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेले आम आदमी पक्षाचे (आप) खासदार संजय सिंह यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकार घडला आहे. संजय सिंह हे पीडित युवतीच्या कुटुंबियांना भेटून बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर अचानक शाई फेकण्यात आली.

(उत्तर प्रदेश): हाथरस येथे पीडित युवतीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेले आम आदमी पक्षाचे (आप) खासदार संजय सिंह यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकार घडला आहे. संजय सिंह हे पीडित युवतीच्या कुटुंबियांना भेटून बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर अचानक शाई फेकण्यात आली.

Video: युवती अडकली वॉशिंग मशिनमध्ये...

हाथरस येथील युवतीवर झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे देशात सध्या असंतोष आहे. देशभरात उत्तर प्रदेश सरकारविरोधात निदर्शने केली जात आहेत. देशातील विविध पक्षाचे नेते पीडितेच्या कुटुंबियांना भेट देऊन त्यांचे सांत्वन करत आहेत. 'आप'चे खासदार संजय सिंह हे सुद्धा त्यांना भेटायला गेले असता त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रकार घडला. अचानक हा प्रकार घडल्यामुळे गोधंळ उडाला. शाई फेकणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतली असून, त्याची चौकशी सुरु आहे.

दरम्यान, खासदार संजय सिंह यांच्या अंगावर शाई फेकल्यानंतर तणावाचे वातावरण पसरले होते. आपच्या कार्यकर्त्यांनी पोलिस प्रशासन आणि उत्तर प्रदेश सराकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. योगी आदित्यनाथ यांचे सरकार दोषींना वाचवू पाहत असल्याचा आरोप 'आप'ने केला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी हाथरस बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांना भेट दिली. यावेळी उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधी यांना धक्कबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ink thrown on aam aadmi partys mp sanjay singh while visiting the victims family in hathras