Video: युवती अडकली वॉशिंग मशिनमध्ये...

वृत्तसंस्था
Monday, 5 October 2020

सोशल मीडियावरून अनेक गंमतीशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एका युवतीचा व्हिडिओ व्हायरल होत असून, अनेकांना हसावे की रडावे कळेनासे झाले आहे. दारूच्या नशेत युवती चक्क वॉशिंग मशिनमध्ये अडकली होती.

लंडनः सोशल मीडियावरून अनेक गंमतीशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एका युवतीचा व्हिडिओ व्हायरल होत असून, अनेकांना हसावे की रडावे कळेनासे झाले आहे. दारूच्या नशेत युवती चक्क वॉशिंग मशिनमध्ये अडकली होती.

एका भयंकर अपघाताचा व्हिडिओ व्हायरल; त्याची काय चूक...

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एका घरामध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मित्र-मैत्रिणी एकत्र आले होते. पार्टीदरम्यान एका युवतीने दारूचे सेवन केले होते. नशा चढल्यानंतर तिने वॉशिंग मशिनमध्ये बसण्याचा प्रयत्न केला. पण, वॉशिंग मशिनमध्ये ती अडकून बसली. कमरेखालचा भाग मशिनमध्ये अडकल्यामुळे तिला बाहेर येता येत नव्हते. अखेर, अग्निशामक दलाच्या जवानांना बोलविण्यात आले. जवानांनी तिची मशिनमधून सुटका केली. संबंधित व्हिडिओ व्हायरल होत असन, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: firefighters rescue girl stuck inside washing machine video viral