
नवी दिल्ली : रशियात तयार करण्यात आलेली ‘आयएनएस तमाल’ ही युद्धनौका येत्या एक जुलै रोजी नौदलाच्या ताफ्यात सामील होणार आहे. रशियातील कालिनीनग्राड येथे या नौकेचे अनावरण होईल. ‘आयएनएस तमाल’ युद्धनौकेत वापरण्यात आलेले २६ टक्के सुटे भाग देशी बनावटीचे आहेत. ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता असलेली ‘आयएनएस तमाल’ ही देशाने आयात केलेली अखेरची युद्धनौका ठरणार आहे.