
उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील प्रेम नगर पोलीस स्टेशन हद्दीतील दीदीपुरमच्या सिलेक्शन पॉइंटवर असलेल्या बर्गर किंग रेस्टॉरंटच्या जेवणात किडे सापडल्याची घटना समोर आली आहे. अन्नात अळी आढळून आल्यानंतर गोंधळ उडाला. रेस्टॉरंट चालकाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मात्र पैसे परत करण्याबाबत बोलताच रोखपाल आणि ग्राहक यांच्यात बाचाबाची झाली. या संपूर्ण प्रकरणी ग्राहकाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली आहे.