आत लक्ष मथुरा-काशीकडे : विनय कटियार 

मंजूषा कुलकर्णी
Wednesday, 5 August 2020

‘राम जन्मभूमी आंदोलन मी सुरू केले होते. आता मंदिराचे काम सुरू होणार आहे. माझी भूमिका एवढीच होती. आता मथुरा-काशीकडे लक्ष द्यायचे आहे. त्यासाठी साधू-संत, ज्येष्ठ नेते यांच्याशी चर्चा करुन मगच निर्णय घेतला जाईल,’’ असे सांगत राम मंदिर आंदोलनातील मुख्य नेते, वादग्रस्त वास्तू पाडल्याच्या प्रकरणातील आरोपी, बजरंग दलाचे संस्थापक आणि भाजपचे नेते विनय कटियार यांनी त्यांची पुढील दिशा स्पष्ट केली. 

पुणे - ‘‘राम जन्मभूमी आंदोलन मी सुरू केले होते. आता मंदिराचे काम सुरू होणार आहे. माझी भूमिका एवढीच होती. आता मथुरा-काशीकडे लक्ष द्यायचे आहे. त्यासाठी साधू-संत, ज्येष्ठ नेते यांच्याशी चर्चा करुन मगच निर्णय घेतला जाईल,’’ असे सांगत राम मंदिर आंदोलनातील मुख्य नेते, वादग्रस्त वास्तू पाडल्याच्या प्रकरणातील आरोपी, बजरंग दलाचे संस्थापक आणि भाजपचे नेते विनय कटियार यांनी त्यांची पुढील दिशा स्पष्ट केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अयोध्येत उद्या होणाऱ्या राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या पार्श्‍वभूमीवर कटियार ‘सकाळ’शी बोलत होते. राम मंदिरची निर्मिती होत आहे, याचा मला आनंद आहे. गुजरातमधील सोमनाथ मंदिराप्रमाणेच हे भाविकांचे श्रद्धास्थान असेल. देशातील हे पहिले मंदिर असेल ज्यासाठी सुमारे एक हजार ५२४ जणांनी हौताम्य पत्करले. अनेकांच्या बलिदानानंतर या मंदिराची उभारणी होत असलेले हे एकमेव उदाहरण आहे, अशी भावना कटियार यांनी व्यक्त केली. 

काँग्रेसमुळे मंदिराला विलंब
मोदी सत्तेवर आल्‍यानंतर राम मंदिराबाबत वेगाने घडामोडी सुरू झाल्या त्याच काळात सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराबाबत निवाडा केला याबद्दल बोलताना ‘‘राम मंदिर उभारणीचा प्रवास मोठा होता. मोदी यांच्या काळात हा वाद संपुष्टात आला हे खरे आहे. पण हा निर्णय लांबविण्याचे काम काँग्रेसने केले आहे. त्यांच्याकडून याबाबत दबाब टाकला जात होता, असा आरोप कटियार यांनी केला. न्यायालयाच्या निर्णयानंतर कोणीही विरोध केलेला नाही. आम्हाला जमीन मिळाली आहे. तसेच मुस्लिमांनाही जागा मिळाली आहे,’’ असे त्यांनी सांगितले. 

अडवानींवर बोलण्यास नकार
अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहणार का, असे विचारता ते साहजिकच हो म्हणाले. पण राम मंदिर आंदोलनातील प्रमुख नेते, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी व मुरली मनोहर जोशी यांना निमंत्रण नाही आणि ते कार्यक्रमाला येणार नाहीत, याकडे  लक्ष वेधल्यावर त्याबाबत बोलण्यास विनय कटियार यांनी नकार दिला.

मोदी हिरो बनले आहेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे, पण राम मंदिर आंदोलनातील त्यांच्या सहभागाबद्दल विचारले असता, कटियार म्हणाले की, राम मंदिराच्या कार्यात आम्ही कोणाचीही अडवणूक केलेली नाही. सर्वांना बरोबर घेतले घेतले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराची उभारणी होत आहे, हे चांगलेच आहे. ते आता ‘हिरो’ बनले आहेत. मोदी यांचे नाव आता चमकतच राहील. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inside attention to Mathura Kashi Vinay Katiyar