Instagram वर पोस्ट केला जीवन संपवण्याचा व्हिडिओ... ५ मिनिटांत पोहोचले पोलीस; UP मध्ये 'Meta Alert'ने वाचवले महिलेचे जीवन

Uttar Pradesh Police rescue woman within five minutes: इन्स्टाग्रामवरील आत्महत्येचा व्हिडिओ ‘मेटा अलर्ट’ने ओळखताच लखनौ डीजीपी मुख्यालयातून फिरोजाबाद पोलिसांना तातडीचा संदेश; अवघ्या पाच मिनिटांत पोहोचून महिलेचा जीव वाचवला.
Instagram Distress Video Leads to Swift Police Action in UP, Woman's Life Saved

Instagram Distress Video Leads to Swift Police Action in UP, Woman's Life Saved

esakal

Updated on

आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि पोलिसांची कमालीची तत्परता कशी एखाद्या व्यक्तीसाठी जीवनदान ठरू शकते, याचा एक जिवंत आणि कौतुकास्पद प्रसंग उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद (Firozabad) जिल्ह्यात समोर आला आहे. कौटुंबिक वाद आणि प्रचंड आर्थिक विवंचनेमुळे टोकाचे पाऊल उचलत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका २५ वर्षीय विवाहित महिलेला 'थाना उत्तर' पोलिसांनी अगदी वेळेवर पोहोचून फासावर लटकण्यापूर्वीच सुरक्षित वाचवले. या संपूर्ण मोहिमेत सोशल मीडिया कंपनी 'मेटा' (Meta Alert) कडून मिळालेला तातडीचा अलर्ट आणि त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांच्या डीजीपी (DGP) मुख्यालयाने दाखवलेली चपळाई मैलाचा दगड ठरली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com